Thursday, July 21, 2022

🛑 शेर्पे खारेपाटण संयुक्त शिक्षण परिषद संपन्न

 🛑 शेर्पे खारेपाटण संयुक्त शिक्षण परिषद संपन्न

शिडवणे : 

          शेर्पे व खारेपाटण केंद्रांची नवीन शैक्षणिक वर्षातील पहिली संयुक्त शिक्षण परिषद शिडवणे नं.१ शाळेत अतिशय नियोजनपूर्वक संपन्न झाली. 

          त्यावेळी तळेरे प्रभागाचे विस्तार अधिकारी सुहास पाताडे , शेर्पे व खारेपाटण केंद्रांचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार , साळीस्ते केंद्रप्रमुख गोपाळ जाधव , गटसाधन केंद्राचे विषयतज्ज्ञ कापसे व प्रशांत सर्पे , खारेपाटण केंद्रमुख्याध्यापक प्रदिप श्रावणकर , शेर्पे केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे , खारेपाटण उर्दु शाळेचे मुख्याध्यापक रुबाब फकीर आणि दोन्ही केंद्रातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. 

          मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन शिक्षण परिषदेला सुरुवात झाली. प्रास्ताविक केंद्रप्रमुख सदगुरु कुबल यांनी केले. शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी शैक्षणिक मार्गदर्शन करुन नवीन शैक्षणिक उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. अध्ययन निश्चिती कार्यक्रम अंतर्गत माहिती खारेपाटण नं.१ शाळेच्या उपशिक्षिका लांघी यांनी दिली. खारेपाटण काझीवाडा शाळेचे उपशिक्षक इरफान सारंग यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाविषयी सविस्तर माहिती कथन केली. शिडवणे नं. १ शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल यांनी रिड टू मी याविषयी प्रात्यक्षिक करुन घेतले. विद्यांजली पोर्टलवर लॉगिन कसे करावे ते सांगितले. विषयतज्ज्ञ कापसे यांनी दिव्यांग प्रकार आणि त्यांची अध्ययनशैली याविषयी अधिक माहिती दिली. केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी केंद्रस्तरीय प्रशासकीय बाबींची माहिती दिली. 

          शिडवणे नं. १ शाळेचे मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार मानले.













































































No comments:

Post a Comment

🔴 खारेपाटण व शेर्पे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद कुरंगवणे खैराट येथे संपन्न; विविध शैक्षणिक उपक्रमांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

🔴  खारेपाटण व शेर्पे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद कुरंगवणे खैराट येथे संपन्न; विविध शैक्षणिक उपक्रमांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन ​ खारेपाटण...