कुरंगवणे : दिनांक : १२ डिसेंबर २०२४
कुरंगवणे खैराट शाळेमध्ये शेर्पे केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव स्पर्धेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात आणि धुमधडाक्यात संपन्न झाला. त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती मा . रविंद्रजी जठार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला.
पहिल्या दिवशी सर्व मैदानी सांघिक , वैयक्तीक खेळ लहान व मोठ्या गटात मुलगे व मुली प्रकारात खेळविण्यात आले. कुरंगवणे गावातील पदाधिकारी यांनी उपस्थितांचे आदरपूर्वक स्वागत केले. कुरंगवणे खैराटवाडी शाळेतील शिक्षकवृंद , शाळा व्यवस्थापन समिती , माता पालक समिती , शिक्षक पालक समिती आणि ग्रामस्थ यांनी अतिशय मेहनत घेतली.
गावाच्या व शाळेच्या वतीने उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शाल , श्रीफळ व बुके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला . क्रीडाप्रतिज्ञा घेण्यात आली . क्रीडाज्योत पेटवून ' आता उठवू सारे रान ' हे गाणे म्हटले गेले . शाळेच्या मुलांनी सुस्वर आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत गायिले . शेर्पे केंद्रातील सर्व शिक्षकवृंद व पंच शिक्षकांनी सामने व्यवस्थित पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली . स्पर्धेमध्ये शिडवणे नं. १ , चिंचवली मधली , शेर्पे , शिडवणे कोनेवाडी , कुरंगवणे पश्चिम , कुरंगवणे खैराट , चिंचवली नं . १ , कुरंगवणे भंडार , बेर्ले या नऊ शाळांचा सहभाग होता. मुलांनी अतिशय कसून आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले.
कुरंगवणे खैराट शाळा आणि गावातील सर्व पदाधिकारी यांनी अतिशय मेहनत घेऊन स्पर्धेचे आयोजन केले . उपस्थित सर्वांना अल्पोपहार , दुपारचे भोजन दिले. मान्यवर , केंद्रप्रमुख , क्रीडाप्रमुख , उपक्रीडाप्रमुख यांनी केलेल्या सूचनांचे सर्व पंचांनी काटेकोर पालन करून पहिल्या दिवसाच्या स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न केल्या.



























































































































