Wednesday, March 30, 2022

🛑 तळेरे प्रभागातील बहुसंख्य मुलांना दाखवला ' पावनखिंड ' चित्रपट

🛑 तळेरे प्रभागातील बहुसंख्य मुलांना दाखवला ' पावनखिंड ' चित्रपट

🟢 वारगावच्या नाना शेट्ये यांनी राबविली ऐतिहासिक क्षेत्रभेट

वारगाव : 

          शाळेच्या अभ्यासक्रमात इतिहास , भूगोल विषयांमध्ये क्षेत्रभेटीचे शैक्षणिक उपक्रम असतात. त्याचाच एक भाग म्हणून माजी वारगाव उपसरपंच व वारगाव नं.३ शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नानासाहेब शेट्ये यांच्या दातृत्वातून तळेरे प्रभागातील तीनशे पन्नासपेक्षा जास्त  शालेय विद्यार्थ्यांना ' पावनखिंड ' चित्रपट मोफत दाखवून एक ऐतिहासिक सफरच घडवून आणली. 

          त्यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या मुलांचे व शिक्षकांचे स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत , माजी वित्त बांधकाम सभापती रविंद्र जठार , माजी कणकवली सभापती दिलीप तळेकर , माजी उपसभापती प्रकाश पारकर , वारगाव सरपंच इरफान मुल्ला , माजी वारगाव सरपंच एकनाथ कोकाटे , कासार्डे माजी सरपंच संतोष पारकर , तेजस जमदाडे , प्रणिल शेट्ये , राजा जाधव , पपू लिंगायत , रवी गुरव , तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , खारेपाटण शेर्पे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार , साळीस्ते केंद्रप्रमुख गोपाळ जाधव आणि शेर्पे , कुरंगवणे खैराट , शिडवणे नं.१ , साळीस्ते नं.१ , कांजीर , कोनेवाडी , वायंगणी , वारगाव , नडगिवे , खारेपाटण शाळांमधील मुख्याध्यापक , शिक्षक , पालक , शाळा व्यवस्थापन समिती , ग्रामपंचायत पदाधिकारी आदी उपस्थित होते. 

          प्रवेशद्वारावर झालेल्या स्वागत समारंभात प्रकाश पारकर म्हणाले , "   छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राची जगात ओळख करुन दिली आहे. त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या जीवांचे बलिदान दिले होते. पावनखिंड हा चित्रपट पाहून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम सदैव जागृत ठेवले पाहिजे. " मुलांना एका आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक क्षेत्रभेटीची सफर घडवून आणल्याबद्दल तळेरे प्रभागाच्या वतीने चित्रपट दाते नानासाहेब शेट्ये यांचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी आभार मानले. बाजीप्रभूंच्या जीवनावर व शिवचरित्रावर आधारित ' पावनखिंड ' हा ऐतिहासिक चित्रपट दाखवल्याबद्दल सर्व गावातील पालक , शिक्षक यांनी नानासाहेब शेट्ये आणि मंडळी यांच्या अनमोल दातृत्वाचे कौतुक केले आहे व आभारही मानले आहेत. नानासाहेब शेट्ये यांनी त्यावेळी खाऊवाटप केले.




































वारगावच्या नाना शेट्ये यांनी राबविली ऐतिहासिक क्षेत्रभेट 

वारगाव : 

          शाळेच्या अभ्यासक्रमात इतिहास , भूगोल विषयांमध्ये क्षेत्रभेटीचे शैक्षणिक उपक्रम असतात. त्याचाच एक भाग म्हणून वारगाव उपसरपंच नाना शेट्ये यांच्या दातृत्वातून तळेरे प्रभागातील तीनशे पन्नासपेक्षा जास्त  शालेय विद्यार्थ्यांना ' पावनखिंड ' चित्रपट मोफत दाखवून एक ऐतिहासिक सफरच घडवून आणली. 

          त्यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या मुलांचे व शिक्षकांचे स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत , माजी वित्त बांधकाम सभापती रविंद्र जठार , माजी कणकवली सभापती दिलीप तळेकर , माजी उपसभापती प्रकाश पारकर , वारगाव सरपंच इरफान मुल्ला , तळेरे प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे , खारेपाटण शेर्पे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल , कासार्डे केंद्रप्रमुख संजय पवार , साळीस्ते केंद्रप्रमुख गोपाळ जाधव आणि शेर्पे , कुरंगवणे खैराट , शिडवणे नं.१ , साळीस्ते नं.१ , कांजीर , कोनेवाडी , वायंगणी , वारगाव , नडगिवे , खारेपाटण शाळांमधील मुख्याध्यापक , शिक्षक , पालक , शाळा व्यवस्थापन समिती , ग्रामपंचायत पदाधिकारी आदी उपस्थित होते. 

          प्रवेशद्वारावर झालेल्या स्वागत समारंभात प्रकाश पारकर म्हणाले , "   छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राची जगात ओळख करुन दिली आहे. त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या जीवांचे बलिदान दिले होते. पावनखिंड हा चित्रपट पाहून विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम सदैव जागृत ठेवले पाहिजे. " मुलांना एका आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक क्षेत्रभेटीची सफर घडवून आणल्याबद्दल तळेरे प्रभागाच्या वतीने चित्रपट दाते नानासाहेब शेट्ये यांचे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनी आभार मानले. बाजीप्रभूंच्या जीवनावर व शिवचरित्रावर आधारित ' पावनखिंड ' हा ऐतिहासिक चित्रपट दाखवल्याबद्दल सर्व गावातील पालक , शिक्षक यांनी नानासाहेब शेट्ये आणि मंडळी यांच्या अनमोल दातृत्वाचे कौतुक केले आहे व आभारही मानले आहेत.


PFMS प्रणालीचे केंद्रस्तरीय मार्गदर्शन

 नडगिवे : खारेपाटण व शेर्पे केंद्रस्तरीय PFMS प्रणाली संदर्भात अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी वायंगणी शाळेचे मुख्याध्यापक अमोल तुपविहिरे यांनी मुद्देसूद व प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. प्रोजेक्टरचा वापर करत त्यांनी सर्व मुख्याध्यापक यांना प्रणाली समजावून सांगितली. त्यावेळी केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल यांनीही मार्गदर्शन केले. मंगेश खांबाळकर यांनीही प्रिंट कशी घ्यावी त्याचे मार्गदर्शन केले. सर्व मुख्याध्यापक व उपशिक्षक यांनी मार्गदर्शक यांचे आभार मानले आहेत. 




 

🛑 ग्रामीण भागातील शाळांकडे सकारात्मक दृष्टिने पाहा : शेर्पे सरपंच निशा गुरव

🛑 शेर्पे खारेपाटण केंद्रस्तरीय संयुक्त शिक्षण परिषद केंद्रशाळा शेर्पे येथे संपन्न

🟢 शेर्पे : 

          दरमहा केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात येते. नियोजित विषयांना अनुसरुन शिक्षकांना शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन करण्यात येते. या महातील शिक्षण परिषद केंद्रशाळा शेर्पे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी शेर्पे सरपंच निशा शेलार म्हणाल्या , " मला आज माझ्या विद्यार्थीदशेची आठवण आली. शेर्पेसारख्या ग्रामीण भागातील आमच्या शाळेने केलेली शैक्षणिक कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यामुळे प्रत्येकाने ग्रामीण भागातील शाळांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.  " 

          प्रारंभी शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.त्याचे मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक उदघाटन करण्यात आले.सूत्रसंचालन केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी केले. दीपप्रज्वलन , ईश्वस्तवन , स्वागतपद्य झाल्यानंतर मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक खारेपाटण शेर्पे केंद्रांचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी केले. त्यानंतर अनिल खोत यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयाचे सविस्तर मार्गदर्शन केले. गटसाधन केंद्राचे विषयतज्ज्ञ सचिन तांबे , नितेश तेली यांनी समावेशित वर्गाचे अध्यापन यावर मार्गदर्शन केले. प्रवीण कासार यांनी शाळा पूर्व तयारी यांवर मार्गदर्शन केले. संध्या खरात यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संदर्भात मार्गदर्शन केले. गोरक्षनाथ गायकवाड यांनी अध्ययन अक्षम मुलांचे अध्ययन या घटकांचे सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन केले. 

          त्यावेळी शेर्पे केंद्रशाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास पांचाळ , खारेपाटण नं। १ चे मुख्याध्यापक प्रदिप श्रावणकर , बागडी , रुबाब फकिर , सखाराम खरात , अनिता पाटकर , गोविंद वावदाने, सुनिल तांबे आणि दोन्ही केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.  केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी सर्वांचे आभार मानले.

































































































🔴 खारेपाटण व शेर्पे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद कुरंगवणे खैराट येथे संपन्न; विविध शैक्षणिक उपक्रमांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

🔴  खारेपाटण व शेर्पे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद कुरंगवणे खैराट येथे संपन्न; विविध शैक्षणिक उपक्रमांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन ​ खारेपाटण...