Monday, January 9, 2023

4 थी शेर्पे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

4 थी शेर्पे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न 

चिंचवली : 

          शेर्पे केंद्रस्तरीय 4 थी शिक्षण परिषद जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधलीवाडी या शाळेत नियोजनपूर्वक संपन्न झाली. 

          त्यावेळी शेर्पे कासार्डे केंद्राचे केंद्रप्रमुख संजय पवार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. केंद्राच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवर शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. केंद्रप्रमुख संजय पवार यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन यातील मुद्द्यांवर उदाहरणे देत तपशीलवार शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन केले. तोंडी काम , निरीक्षण , प्रयोग , प्रात्यक्षिक , चाचणी , स्वाध्याय आणि प्रकल्प यावरही त्यांनी अधिक प्रकाश टाकला.

          अनिल खोत यांनी सूत्रसंचालन केले. अमोल भंडारी यांनी आभार मानले. शिक्षण परिषदेला शेर्पे केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. अनिल खोत यांनी शाळा विकास आराखडा , शाळा गुणवत्ता विकास आराखडा , बालसभा , पालक सभा आणि शैक्षणिक ग्राम सभा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अमोल भंडारी यांनी अध्ययन निष्पत्ती विषयावर उदाहरणे देऊन अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. सर्व शिक्षकांनी चर्चेत भाग घेतला. त्यावेळी केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे , श्रीपाद बागडी , सखाराम खरात , प्रभा अकिवाटे आणि सर्व शिक्षक शिक्षण परिषदेला उपस्थित होते.
















































🔴 खारेपाटण व शेर्पे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद कुरंगवणे खैराट येथे संपन्न; विविध शैक्षणिक उपक्रमांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

🔴  खारेपाटण व शेर्पे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद कुरंगवणे खैराट येथे संपन्न; विविध शैक्षणिक उपक्रमांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन ​ खारेपाटण...