Friday, September 26, 2025

🔴 खारेपाटण रामेश्वर शाळेत शेर्पे-खारेपाटण केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद संपन्न; शैक्षणिक सादरीकरणातून शिक्षकांचे मंथन.

         खारेपाटण (सिंधुदुर्ग): शेर्पे व खारेपाटण या दोन्ही केंद्रांची संयुक्त शिक्षण परिषद आज, शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी खारेपाटण येथील रामेश्वर शाळेत उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत शिक्षकांनी विविध शैक्षणिक विषयांवर सादरीकरणे करत ज्ञानाचे आदानप्रदान केले.

          परिषदेची सुरुवात शारदा पूजनाने आणि प्रार्थनेने झाली. शाळेचे मुख्याध्यापक संतोष धुळप आणि बुरांगे यांनी उपस्थित सर्व मान्यवर व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संदीप कदम यांनी केले.

          या परिषदेला निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सदानंद ढेकणे, केंद्रप्रमुख संजय पवार, केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नर्गिस मुलाणी, मुख्याध्यापक संतोष धुळप, श्रीपाद बागडी, सखाराम खरात, केंद्रमुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, गोविंद वावदाने, मंगेश मुद्रस यांच्यासह दोन्ही केंद्रांतील शिक्षक उपस्थित होते.

          परिषदेंतर्गत विषयपत्रिकेनुसार महत्त्वपूर्ण शैक्षणिक सादरीकरणे झाली. यात प्रभा अकिवाटे यांनी पॅट सांख्यिकीय विश्लेषण शैक्षणिक प्रक्रिया, नाजमीन मुल्ला यांनी हरित शाळा मूल्यांकन, हेमा वंजारी यांनी एक भारत श्रेष्ठ भारत आणि कोमल कुरणे यांनी रंगोत्सव, विद्यार्थी समूह या विषयांवर माहिती दिली. केंद्रप्रमुख संजय पवार यांनी यावेळी शिक्षकांना शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन केले. निवृत्त अधिकारी सदानंद ढेकणे यांनी आपले शैक्षणिक मनोगत व्यक्त केले. 

          अखेरीस, दोन्ही केंद्राच्या वतीने केंद्रमुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, मार्गदर्शक शिक्षक आणि परिषद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या रामेश्वर शाळेचे आभार मानले. ही संयुक्त शिक्षण परिषद दोन्ही केंद्रांतील शिक्षकांना नवीन शैक्षणिक संकल्पना आत्मसात करण्यास प्रेरक ठरली.







































🔴 खारेपाटण व शेर्पे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद कुरंगवणे खैराट येथे संपन्न; विविध शैक्षणिक उपक्रमांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

🔴  खारेपाटण व शेर्पे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद कुरंगवणे खैराट येथे संपन्न; विविध शैक्षणिक उपक्रमांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन ​ खारेपाटण...