Tuesday, August 29, 2023

🛑 शेर्पे खारेपाटण केंद्रांची संयुक्त शिक्षण परिषद संपन्न

 🛑 शेर्पे खारेपाटण केंद्रांची संयुक्त शिक्षण परिषद संपन्न

🔹 खारेपाटण रामेश्वर शाळेने केले उत्तम नियोजन

▪️खारेपाटण : 

          केंद्रप्रमुख संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली खारेपाटण शेर्पे केंद्रांची ऑगस्ट महातील संयुक्त शिक्षण परिषद खारेपाटण रामेश्वर शाळेत अतिशय उत्साहात संपन्न झाली. 

          त्यावेळी रामेश्वर शाळेचे मुख्याध्यापक संतोष धुळप यांनी सर्व मान्यवर व मार्गदर्शक यांचे गुलाबपुष्प देईन हार्दिक स्वागत केले. मान्यवरांनी दीपप्रज्वलन करुन परिषदेचे उद्घाटन केले. 

          शेर्पे केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी उदाहरणे देत तपशीलवार माहिती दिली. अनिल खोत यांनी प्रशस्त अँप विषयी ऑनलाइन माहिती दिली. राजेश तेरवणकर यांनी शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती विषयक कार्यशाळा घेतली.  प्रभा अकिवाटे यांनी अध्ययन निष्पत्ती संदर्भात मुद्देसूद मार्गदर्शन केले. सुजाता कुडतरकर यांनी जिल्हा गुणवत्ता कक्ष विषयक माहिती दिली. 

          केंद्रप्रमुख संजय पवार यांनी प्रशासकीय मार्गदर्शन केले. शारदा तांदळे यांनी सूत्रसंचालन केले.


🔴 खारेपाटण व शेर्पे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद कुरंगवणे खैराट येथे संपन्न; विविध शैक्षणिक उपक्रमांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

🔴  खारेपाटण व शेर्पे केंद्राची संयुक्त शिक्षण परिषद कुरंगवणे खैराट येथे संपन्न; विविध शैक्षणिक उपक्रमांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन ​ खारेपाटण...