🛑 शेर्पे खारेपाटण केंद्रांची संयुक्त शिक्षण परिषद संपन्न
🔹 नडगिवे नं.१ शाळेने केले उत्तम नियोजन
▪️नडगिवे :
दरवर्षी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदा संपन्न होत असतात. यावर्षीची पहिली शिक्षण परिषद जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे नं.१ येथे नियोजनपूर्वक संपन्न झाली.
त्यावेळी विविध शैक्षणिक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. PGI म्हणजेच कार्यक्षमता प्रतवारी संदर्भातील मार्गदर्शन पदवीधर शिक्षक गोविंद वावदाने यांनी केले. लेट्स चेंज चित्रपट व स्वच्छता मॉनिटर या विषयाचे मार्गदर्शन चिंचवली मधलीचे उपशिक्षक अमोल भंडारी यांनी केले. नडगिवे नं.१ शाळेचे पदवीधर शिक्षक संदिप कदम यांनी परसबाग आणि आजी आजोबा दिवस या उपक्रमांची उदाहरणांसह माहिती दिली. नवीन एकात्मिक पाठ्यपुस्तकातील ' माझी नोंद ' या पानांवर कोणत्या प्रकाराच्या नोंदी कराव्यात याविषयी सविस्तर मार्गदर्शन समिधा शेट्ये यांनी केले. शेर्पे खारेपाटण कासार्डे केंद्रांचे केंद्रप्रमुख संजय पवार यांनी शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन केले.
त्यावेळी दोन्ही केंद्रात बदली होऊन आलेल्या शिक्षक शिक्षिकांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्राथमिक शिक्षक बँकेचे नवनिर्वाचित संचालक केंद्रप्रमुख संजय पवार यांचा दोन्ही केंद्रांच्या वतीने शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन संदीप कदम यांनी केले.
त्यावेळी व्यासपीठावर प्रदिप श्रावणकर , श्रीपाद बागडी , सखाराम खरात , दशरथ शिंगारे इत्यादी मुख्याध्यापक उपस्थित होते. दोन्ही केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी शिक्षण परिषदेचा लाभ घेतला. पहिली शिक्षण परिषद अतिशय उत्साहात संपन्न झाली.




































No comments:
Post a Comment