🛑 शेर्पे खारेपाटण केंद्रस्तरीय संयुक्त शिक्षण परिषद केंद्रशाळा शेर्पे येथे संपन्न
🟢 शेर्पे :
दरमहा केंद्रस्तरीय शिक्षण परिषद आयोजित करण्यात येते. नियोजित विषयांना अनुसरुन शिक्षकांना शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन करण्यात येते. या महातील शिक्षण परिषद केंद्रशाळा शेर्पे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. त्यावेळी शेर्पे सरपंच निशा शेलार म्हणाल्या , " मला आज माझ्या विद्यार्थीदशेची आठवण आली. शेर्पेसारख्या ग्रामीण भागातील आमच्या शाळेने केलेली शैक्षणिक कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यामुळे प्रत्येकाने ग्रामीण भागातील शाळांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. "
प्रारंभी शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.त्याचे मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक उदघाटन करण्यात आले.सूत्रसंचालन केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी केले. दीपप्रज्वलन , ईश्वस्तवन , स्वागतपद्य झाल्यानंतर मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक खारेपाटण शेर्पे केंद्रांचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी केले. त्यानंतर अनिल खोत यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयाचे सविस्तर मार्गदर्शन केले. गटसाधन केंद्राचे विषयतज्ज्ञ सचिन तांबे , नितेश तेली यांनी समावेशित वर्गाचे अध्यापन यावर मार्गदर्शन केले. प्रवीण कासार यांनी शाळा पूर्व तयारी यांवर मार्गदर्शन केले. संध्या खरात यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संदर्भात मार्गदर्शन केले. गोरक्षनाथ गायकवाड यांनी अध्ययन अक्षम मुलांचे अध्ययन या घटकांचे सविस्तर मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी शैक्षणिक व प्रशासकीय मार्गदर्शन केले.
त्यावेळी शेर्पे केंद्रशाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास पांचाळ , खारेपाटण नं। १ चे मुख्याध्यापक प्रदिप श्रावणकर , बागडी , रुबाब फकिर , सखाराम खरात , अनिता पाटकर , गोविंद वावदाने, सुनिल तांबे आणि दोन्ही केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. केंद्रमुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी सर्वांचे आभार मानले.

































































































No comments:
Post a Comment